महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनाच्या केसेस वाढत असतानाही तारा सुतारिया, अर्जुन कपूर गोव्यात करताहेत शुटिंग - तारा सुतारिया, अर्जुन कपूर गोव्यात करताहेत शुटिंग

कोविड -१९ च्या केसेसमध्ये एकीकडे वाढ होत असताना आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या टीमने गोव्यात शूटिंग सुरू केले आहे. अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी यांचा हा चित्रपट २०१४मध्ये गाजलेल्या एक व्हिलन चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Ek Villain Returns shoot
‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या टीमने गोव्यात शूटिंग सुरू

By

Published : Apr 17, 2021, 4:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर यांनी शनिवारी जाहीर केले की त्यांनी आगामी रोमँटिक थ्रिलर 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

ताराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. तिने “डे वन ...” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ताराने आपला को-स्टार अर्जुन, दिग्दर्शक मोहित सूरी आणि निर्माता अमूल विकास मोहन यांनाही टॅग केले आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या टीमने गोव्यात शूटिंग सुरू

अर्जुनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ताराचा व्हिडिओ पुन्हा शेअर करुन आपल्या चाहत्यांनाही याबद्दल माहिती दिली. २०१७ मध्ये आलेल्या हाफ गर्लफ्रेंड चित्रपटानंतर अर्जुन आणि मोहित सुरी यांचा हा पुन्हा एकत्र चित्रपट आहे.

आजपासून सुरू झालेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शुटिंग करण्यासाठी दोन्ही कलाकार १४ एप्रिलला गोव्याला रवाना झाले.

मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाचे शूटिंग १ मार्च रोजी मुंबईत सुरू झाले. पहिले शेड्यूलमध्ये दिशा पाटनी आणि जॉन अब्राहम यांचे शुटिंग पार पडले. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्मात्यांनी चांगले लोकेशन शोधून गोव्यात पुढील शेड्यूल ठरवले आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा २०१४ मधील एक व्हिलन या बॉलिवूड चित्रपटाचा सिक्वल आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा - कॅन्सल बोर्ड परीक्षा' याचिकेच्या मोहीमेत सोनू सूददेखील सामील

ABOUT THE AUTHOR

...view details