मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने, तिचा उद्योजक पती राज कुंद्रा याच्या वादग्रस्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक न्यू एंडिंग बाबतचा संदेश पोस्ट केला आहे. पोर्नोग्राफी रॅकेटशी संबंध असल्याबद्दल राज कुंद्रा अडचणीत आला आहे. मालाड पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये मढ आयलँडमधील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि 19 जुलै रोजी कुंद्रा आणि थोरपे यांना अटक केल्याने मनोरंजन उद्योगाला धक्का बसला.
दरम्यान, पॉर्न रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४६७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याने मुंबई सत्र न्यायालयातून त्याचा जामीन अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर त्याने पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानं त्याच आधारावर कुंद्रा जामीनासाठी दावा दाखल केला होता. अखेर त्याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आता पुढे काय असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान, शिल्पाने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील एका पुस्तकाचा उतारा शेअर केला. याची सुरुवात कार्ल बार्डच्या एका प्रसिध्द कोटने होते. यात लिहिलंय : "जरी कोणीही पाठी मागे जाऊन एक नवीन सुरुवात करू शकत नसले, तरी कोणीही आतापासून सुरुवात करू शकतो आणि एक नवीन शेवट करू शकतो." शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या उताऱ्याचे शीर्षक नवीन शेवट (New endings) असे आहे.