महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभनं शेअर केला 'या' अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो, म्हणाले, ओळखा पाहू कोण? - pukar

अमिताभ यांनी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ओळखा पाहू कोण? असे कॅप्शन दिले आहे.

अमिताभनं शेअर केला फोटो

By

Published : May 17, 2019, 1:59 PM IST

मुंबई- अभिनेत्री करिना कपूर सध्या चित्रपटांपेक्षाही तैमूरमुळेच अधिक चर्चेत असते. अशात करिनाच्या बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार. आता खुद्द बिग बींनी करिनाचा लहानपणीचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

१९८३ मधील 'पुकार' चित्रपटाच्या सेटवर करिना वडिल रणधीर कपूरसोबत आली होती. तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली होती, असे अमिताभ यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोत ते करिनाच्या पायाला झालेल्या जखमेला औषध लावताना दिसत आहेत.

अमिताभनं शेअर केला फोटो

दरम्यान 'पुकार' चित्रपटात अमिताभ बच्चन, रणधीर कपूर आणि झिनत अमान हे कलाकार झळकले होते. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, अमिताभ लवकरच 'ब्रह्मास्त्र' आणि 'चेहरे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'चेहरे' चित्रपटाच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details