महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा व्हिडिओ : अल्लू अर्जुनची मुलगी अर्हाचा 'कचा बदाम' गाण्यावर डान्स

अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवर मुलगी अर्हाचा 'कचा बदाम' या व्हायरल गाण्यावर डान्स करीत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अल्लूचे चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत. अल्लू अर्जुनची मुलगी अर्हाचा 'कचा बदाम' गाण्यावर डान्स

By

Published : Feb 10, 2022, 5:51 PM IST

अल्लू अर्जुनची मुलगी अर्हा
अल्लू अर्जुनची मुलगी अर्हा

हैदराबाद - साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द राइज - भाग 1' आणि त्यातील 'श्रीवल्ली', 'उंटावा' आणि 'सामी' या गाण्यांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर लहान मुले, म्हातारे आणि तरुण 'पुष्पा'च्या गाण्यांवर रील्स तयार करून सोशल मीडियावर सोडत आहेत. मात्र अल्लू अर्जुनच्या घरात कचा बदाम गाण्याची हवा पाहायला मिलत आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवर मुलगी अर्हाचा 'कचा बदाम' या व्हायरल गाण्यावर डान्स करीत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत अल्लूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मेरी छोटी बदाम अर्हा'.

अल्लूचे चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अल्लूचे चाहते आणि सेलिब्रिटी देखील या व्हिडिओवर छान कमेंट करत आहेत. अल्लू अर्जुनला अल्लू अर्हा आणि अल्लू अयान अशी दोन मुले आहेत.

याआधी अल्लूची मुलगी अर्हा हिने अनेक दिवसांनी घरी परतलेल्या वडिलांचे स्वागत केले होते. याचा एक फोटो अल्लूने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अल्लूने लिहिले की, “परदेशातून 16 दिवसांनी परतल्यानंतरचे सर्वात गोड स्वागत", या फोटोमध्ये फुलांनी स्वागत नाना असे लिहिले आहे.

अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले.

हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला तेव्हा त्याने १०० कोटींचा टप्पा पार केला. 'पुष्पा' चित्रपटातील अल्लूचा अभिनय आणि त्याच्या नृत्याने आतापर्यंत धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा -पाहा व्हिडिओ : अल्लू अर्जुनचे रुपांतर 'पुष्पा'मध्ये कसे झाले?

ABOUT THE AUTHOR

...view details