मुंबई- जॉन अब्राहम, दिशा पाटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू झाले आहे. दिशा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुटिंग सुरू झाल्याचे घोषणा केली आहे.
दिशाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये तिची पाठ कॅमेराकडे असून ती काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेली दिसत आहे . तिच्या पाठीवर लिहिलंय, "एक व्हिलन रिटर्न्स."
त्यानंतर तिचा कथित बॉय फ्रेंड टायगर श्रॉफचीही प्रतिक्रिया तिला मिळाली. त्याने उत्तर देताना लिहिलंय, "ऑल द बेस्ट व्हिलन".