मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे तब्बल २० वर्षानंतर एकत्र येत आहेत. सलमान खानने त्यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा संजय लिला भन्साळी हे सलमानला घेऊन चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट हिची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे.
आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिच्या 'राजी', 'गली बॉय' या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. या चित्रपटातून आलियाच्या दमदार अभिनयामुळे यावर्षात तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागलेल्या आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय लिला भन्साळीच्या आगामी चित्रपटात आलिया भट्ट भूमिका साकारणार आहे. मात्र, आलियाने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही.