महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ईद'च्या दिवशी आलियाचे दोन चित्रपट होणार प्रदर्शित, रणबीरच्या 'समशेरा'ला देणार टक्कर

अलिकडेच आलियाची सलमान खानच्या 'ईन्शाल्ला' चित्रपटासाठी वर्णी लागली आहे.तर एस.एस. राजामौलीच्या ट्रिपल आर (RRR) या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही चित्रपट पुढील वर्षी 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

By

Published : Mar 21, 2019, 8:06 PM IST

'ईद'च्या दिवशी आलियाचे दोन चित्रपट होणार प्रदर्शि



मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या लोकप्रियतेच्या यशोशिखरावर आहे. आलियाचे एकामागुन एक चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. त्यामुळे सध्या तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. आगामी काळात ती बऱ्याच चित्रपटामध्ये झळकणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आलियाच्या दोन्हीही चित्रपटांमध्ये चुरस निर्माण होणार आहे.

अलिकडेच आलियाची सलमान खानच्या 'ईन्शाल्ला' चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. तर एस.एस. राजामौलीच्या ट्रिपल आर (RRR) या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही चित्रपट पुढील वर्षी 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

सलमान खानने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की त्याचा 'ईन्शाल्ला' हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल.



राजामौलींच्या 'ट्रिपल आर' (RRR) या चित्रपटात रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपटदेखील ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.


एवढेच नाही, तर रणबीर कपूर याचा आगामी 'समशेरा' हा चित्रपट देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आलियाच्या चित्रपटांच्या शर्यतीत रणबीरचा 'समशेरा' देखील उतरणार आहे. आता या चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


सध्या आलिया भट्ट तिच्या 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं पहिलं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता काही दिवसात या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details