महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रीदेवी आणि इरफान खानच्या स्मृतींना अमिताभ यांनी दिला उजाळा - पिकू

'खुदा गवाह' २८ वर्षापूर्वी याच आठवड्यात रिलीज झाला होता. त्यानंतर पाच वर्षापूर्वी ८ मे या दिवशी 'पिकू' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा रिलीज झाला होता. यातील अनुक्रमे श्रीदेवी आणि इरफान खान या कलाकारांच्या आठवणी अमिताभ यांनी जागवल्या आहेत.

Big B remembers Sridevi, Irrfan
श्रीदेवी आणि इरफान खान

By

Published : May 9, 2020, 5:02 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'खुदा गवाह' २८ वर्षापूर्वी याच आठवड्यात रिलीज झाला होता. त्यानंतर पाच वर्षापूर्वी ८ मे या दिवशी 'पिकू' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा रिलीज झाला होता.

अमिताभ यांनी या दोन्ही चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी जागवत यातील कलाकारांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. दुर्दैवाने या चित्रपटातील अमिताभ यांचे सहकलाकार श्रीदेवी आणि इरफान आता या जगात नाहीत. खासकरुन सुपरस्टार श्रीदेवी या 'खुदा गवाह'च्या सहकलाकार होत्या आणि मुकुल एस. आनंद याचे दिग्दर्शक होते.

'पिकू'बद्दल लिहिताना अमिताभ यांनी इरफान खान यांचा उल्लेख केलाय. अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून दोघांच्याही आठवणी जागवल्या आहेत. श्रीदेवी आणि इरफान लवकर निघून गेल्याची सल बच्चन यांच्या मनात आहे. 'खुदा गवाह'चे दिग्दर्शक मुकुल एस. आनंद हेदेखील लवकर निवर्तल्याचे अमिताभ यांनी म्हटलंय. त्यांचे डोळे हे जादुई कॅमेऱ्याची लेन्स होते..त्यांना करिश्माई नजर होती, असेही त्यांनी लिहिलंय.

'खुदा गवाह'चे शूटिंग अफगाणीस्तानमध्ये पार पडले होते. तर 'पिकू'चे शूटिंग कोलकात्यामध्ये झाले होते. दोन्ही ठिकाणच्या आठवणी अमिताभ यांनी जागवल्या आहेत.

श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी दुबईतील हॉटेलमध्ये पाण्याच्या टबमध्ये बुडून निधन झाले होते. तर इरफान खान यांचे २९ एप्रिलला मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. दोन्ही कलाकारांसोबत काम केल्यानंतर ते आज या जगात नाहीत याचे अतिव दुःख अमिताभ यांना झाल्याचे त्यांच्या पोस्टवरुन दिसते.

ABOUT THE AUTHOR

...view details