मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वीच कलंक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, या सिनेमाला अपयश आलं, यानंतर आता ती 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून आलिया आणि अयानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
आलियानं शेअर केला अयान मुखर्जीसोबतचा फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - नागार्जुन
आलियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं अयानसोबतचा आपला एक फोटो पोस्ट केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, हॅपी बर्थडे वंडर बॉय.
![आलियानं शेअर केला अयान मुखर्जीसोबतचा फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4146664-thumbnail-3x2-alia.jpg)
यामुळेच आलियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं अयानसोबतचा आपला एक फोटो पोस्ट केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, हॅपी बर्थडे वंडर बॉय. दरम्यान ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने आलिया आणि अयानची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.
या सिनेमात आलियाशिवाय रणबीर कपूरदेखील मुख्य भूमिकेत असून आलियासोबत त्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. तर अयान मुखर्जीसोबत रणबीरनं याआधीही 'ये जवानी हैं दिवानी' आणि 'वेक अप सिद' या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.