महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आलिया भट्टने सुरू केली फल्म कंपनी, 'लोगो'चे अनावरण - डार्लिंग या पहिल्या चित्रपटाची निर्मिती

अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे. सोशल मीडियावर तिने इटरनल सनशाईन प्रॉडक्शन्सची घोषणा केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे शीर्षक आहे 'डार्लिंग'.

Alia Bhatt
अभिनेत्री आलिया भट्ट

By

Published : Mar 1, 2021, 5:05 PM IST

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शन हऊसचा शुभारंभ केला आहे. तिच्या प्रॉडक्शनच्या वतीने डार्लिंग या पहिल्या चित्रपटाची निर्मिती ती करणार असून आपल्या कंपनीचा लोगो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

''मला जाहीर करताना आनंद होतोय की, प्रॉडक्शन! इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स सुरू करीत आहे. चला आम्ही तुम्हाला गोष्टी सांगू. आनंदी गोष्टी. आल्हाददायक गोष्टी. खऱ्या गोष्टी, कालातीत गोष्टी,'' असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

तिच्या बॅनरबद्दलच्या घोषणेच्या काही मिनिटांतच आलियाने निर्माती म्हणून तिच्या पहिल्या चित्रपटाची बातमी देऊन सर्वांनाच चकित केले. ''हे एक खास आहे. माझ्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शनच्या वतीने निर्माण होणाऱ्या पहिल्या चित्रपटाचे शीर्षक आहे 'डार्लिंग'. शाहरुख खानच्या रेड चिलीजच्यासोबत ही निर्मिती करीत आहे.'', असे तिने पोस्टमध्ये लिहिलंय.

आलिया लवकरच चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये दिसणार आहे आणि पुढच्या काही महिन्यांत ब्रह्मास्त्र, आरआरआर आणि डार्लिंग्ज अशा चित्रपटात झळकेल.

हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?

ABOUT THE AUTHOR

...view details