नवी दिल्ली :अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण झाली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
"माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक ती काळजी घेत आहे. तुम्ही सर्व देत असलेल्या प्रेमासाठी आणि आधारासाठी धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा" अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केली होती.