मुंबई (महाराष्ट्र)- चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा बहुप्रतीक्षित चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात आलिया भट्ट मुक्या भूमिका साकारत आहे. भन्साळी प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाची नवीन रिलीजची तारीख जाहीर केली.
'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ती सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटात दिसणार होती. संजय लीला भन्साळीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, काही कारणास्तव सलमानने या चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे आलिया भट्ट आता त्यांच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये भूमिका साकारणार आहे.
गंगुबाई काठीवाडी हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट राहणार आहे.