मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वीच कलंक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, तिच्या या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर ती आपल्या आगामी तख्त आणि सडक २ च्या चित्रीकरणात व्यग्र झाली. आता आलियानं तख्तसाठीची तयारी सुरु असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आलिया-रणवीरची 'तख्त'साठी तयारी, शेअर केला व्हिडिओ - ranveer singhs upcoming movie
हा व्हिडिओ धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमधील असून यात चित्रपटाबद्दलचं संभाषण करताना निर्माता करण जोहर दिसत आहे. तर तख्त असं नाव लिहिलेला एक कपही आलियाच्या हातात पाहायला मिळत आहे
हा व्हिडिओ धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमधील असून यात चित्रपटाबद्दलचं संभाषण करताना निर्माता करण जोहर दिसत आहे. तर तख्त असं नाव लिहिलेला एक कपही आलियाच्या हातात पाहायला मिळत आहे. यावेळी याठिकाणी रणवीर सिंगदेखील उपस्थित होता. मात्र, आलियाने आपल्या कॉफी मग मागे त्याचा चेहरा झाकला आहे.
दरम्यान ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेल्या तख्त चित्रपटात प्रेक्षकांना रणवीर आणि आलियाशिवाय विकी कौशल, करिना कपूर खान, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्टदेखील पाहायला मिळणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.