मुंबई- वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वचजण प्रेमास पात्र असतात. असाच प्रेमळ अनुभव आज आलिया भट्ट घेत आहे. ती आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असून रणबीर कपूरची आई व होणारी तिची सासू नीतू कपूर यांनीही आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इंस्टाग्राम स्टोरीवर रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलियासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. "आंतर्बाह्य सुंदर असलेल्या आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,'' असे त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
आलिया भट्टला नीतू कपूरकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा आलिया सध्या तिची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदानसोबत सुट्टीवर आहे. आलियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तिघे मालदीवमध्ये असल्याची माहिती आहे. आलियाचा प्रियकर रणबीर तिच्या वाढदिवशी तिथे उड्डाण करून तिच्यासोबत सामील होईल की नाही हे स्पष्ट नाही. हे दोघे लग्नगाठ बांधणार असल्याची गेल्या दोन वर्षापासून चर्चा आहे. याआधीच्या एका मुलाखतीत रणबीरने असेही म्हटले होते की, कोविड महामारी नसती तर त्याचे आणि आलियाचे लग्न झाले असते.
कामाच्या आघाडीवर आलियाने अलीकडेच 'गंगूबाई काठियावाडी' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. ती पुढे 'RRR' मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया रणबरसोबत दिसणार आहे.
हेही वाचा -स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्सच्या हिंदी रिमेकच्या बातमीला आमिर खानने दिला दुजोरा