मुंबई- 'गली बॉय' चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर आलियाने आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. 'सडक २' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी आलिया आता उटीला रवाना झाली आहे.
'सडक २'च्या चित्रीकरणासाठी आलिया उटीला रवाना, शेअर केला फोटो - mahesh bhatt
सडक २ चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट करत असून हा १९९१ मध्ये आलेल्या 'सडक' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय आदित्य रॉय कपूरही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आलियानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या स्क्रीप्टचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. उटीमधील चित्रीकरणाला आलियाने १२ जुलैपासून सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं या चित्रपटासाठी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं.
सडक २ चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट करत असून हा १९९१ मध्ये आलेल्या 'सडक' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय आदित्य रॉय कपूरही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट २०२० मध्ये २५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.