महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महेश भट्टची लेक झाली नवरी, पाहा व्हिडिओ

नुकतंच आलियानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ब्रायडल लूकमधील आपले काही फोटो शेअर केले होते. यानंतर आता नवरीच्या लूकमधील आलियाच्या या जाहिरातीचा व्हिडिओही समोर आला आहे.

महेश भट्टची लेक झाली नवरी

By

Published : Sep 1, 2019, 9:29 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशात आता आलियाने अनुष्काची जागाही पटकावली आहे. अनुष्का शर्मा एका फॅशन डिझायनर हाऊससाठी मॉडेल म्हणून जाहिराती करत होती. याजागी आता आलियाची वर्णी लागली आहे.

हेही वाचा - मलायकासाठी अर्जुन बनला फोटोग्राफर, संजय कपूरनं केली अशी कमेंट

नुकतंच आलियानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ब्रायडल लूकमधील आपले काही फोटो शेअर केले होते. यानंतर आता नवरीच्या लूकमधील आलियाच्या या जाहिरातीचा व्हिडिओही समोर आला आहे. आपल्या बिनधास्त आणि डॅशिंग अंदाजाने ओळखली जाणारी आलिया हा जाहिरातीतही अशाच अंदाजात दिसत आहे.

काहीशी विनोदी आणि काहीशी भावनिक असणारी ही जाहिरात आलियाच्या जबरदस्त अभिनयाची आणखी एक झलक आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, आलियाने तिच्या आगामी 'सडक २' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तसेच, तिचा 'प्राडा' हा म्युझिक अल्बमही प्रदर्शित झाला आहे. तिचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटदेखील चर्चेत आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.

हेही वाचा -ही झाडं आमची, नाही कोणाच्या बापाची; झाडांच्या कत्तलीविरोधात श्रद्धाची निदर्शनं

ABOUT THE AUTHOR

...view details