संजय लीला भंसाली यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या शूटदरम्यान अनेक अडथळे आले. भंसाली आणि 'विवाद' एकाच बिल्डिंगमध्ये राहत असावेत कारण त्यांचा नवीन चित्रपट सुरु झाला की 'विवाद' त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकतो. 'गंगुबाई काठियावाडी' या संजय लीला भंसाली दिग्दर्शित आणि आलिया भट अभिनित आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला विषय हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलेला असून या मधील दाखवलेल्या गोष्टी या खोट्या असल्याचा आरोप गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी केलेला होता आणि त्यानुसार या संदर्भात माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्याचा निर्णय होणे बाकी आहे म्हणूनच भंसाली आणि 'कॉंट्रोव्हर्सी' हातात हात घालून फिरतात की काय असे वाटून जाते.
संजय लीला भंसाली आणि आलिया भट पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. ही कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवलीच्या जीवनाभोवती फिरते आणि हुसेन जैदीच्या मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेसी देखील आहेत. लॉकडाऊनमुळे याच्या चित्रीकरणात व्यत्यय आला आणि सेटबाहेरील घडणाऱ्या गोष्टींमुळेदेखील पूर्ण होण्यास उशीर झाला.
परंतु आता गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून तो 'पोस्ट-प्रॉडक्शन'ला जाईल. शूट 'रॅप-अप' झाल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात संजय लीला भंसाली यांना मानवंदना दिली. आलियाने आपल्या सोशल मीडियावर आपल्या 'सरांसाठी' भावनिक चिट्ठी लिहिली ज्यात या चित्रपटात काम करण्याच्या आनंददायक प्रवासाबद्दल एक सुंदर टीप सामायिक केली.
'गंगूबाई काठियावाडी'चे 'शूट रॅप-अप', भंसालींसाठी आलियाने लिहिली भावनिक चिट्ठी! - Alia Bhatt
संजय लीला भंसाली आणि आलिया भट पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. ही कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवलीच्या जीवनाभोवती फिरते आणि हुसेन जैदीच्या मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेसी देखील आहेत. लॉकडाऊनमुळे याच्या चित्रीकरणात व्यत्यय आला आणि सेटबाहेरील घडणाऱ्या गोष्टींमुळेदेखील पूर्ण होण्यास उशीर झाला.
'गंगूबाई काठियावाडी'चे 'शूट रॅप-अप', भंसालींसाठी आलियाने लिहिली भावनिक चिट्ठी!
संजय लीला भंसाली आणि डॉ. जयंतीलाल गाडा (पेन स्टुडिओ) निर्मित, ‘गंगूबाई काठियावाडी’, देशातील सध्याची कोरोना परिस्थिती व्यवस्थित झाल्यावर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Last Updated : Jun 27, 2021, 8:20 PM IST