मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बॉलिवूडचे चाहते आणि काही सेलेब्रिटी अनन्या पांडे, आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यावर घराणेशाहीचा फायदा घेऊन मोठे झाल्याचा आरोप करीत आहेत.
याबरोबरच काही निर्मात्यांवरही हा आरोप होत आहे. करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, सलमान खान यांच्यावरही घराणेशाहीचा आरोप होत आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी याबाबत आपले मौन सोडले आहे. त्यांनी म्हटलंय, ''आज जे भाई-भतिजावाद करीत आहेत, उद्या त्यांची मुले जर या क्षेत्रात येणार असतील तर तेव्हही ते असेच म्हणणार का?''
सोनी यांची ही पोस्ट हंसल मेहता यांच्याट्विटनंतर आली आहे. मेहता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, ''या भाई-भतिजावादाचे स्वरुप व्यापक बनवले पाहिजे. मेरिट सर्वात महत्त्वाचे आहे. माझ्यामुळे माझ्या मुलाला दरवाजापर्यंत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. आणि का नाही. परंतु तो सर्वात चांगल्या कामाचा अविभाज्य भाग बनला आहे. कारण तो प्रतिभाशाली आहे, शिस्तबध्द, मेहनती आहे आणि माझ्या सारखाच मूल्य शेअर करतो. तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून नाही.''
हेही वाचा - पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सुशांतसाठी लिहिली भावूक पोस्ट
त्यांनी पुढे लिहिलंय, ''मी प्रोड्यूस करणार आहे म्हणून तो सिनेमा बनवणार नाही, पण यासाठीच कारण तो यासाठी पात्र आहे. त्याच्या संघर्ष करण्यापर्यंतच त्याचे करियर असेल. शेवटी तोच त्याचे भविष्य निर्माण करेल, त्याचा बाप नाही. माझी सावली त्याच्यासाठी सर्वात मोठा लाभ आणि प्रतिबंध आहे.''