महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गंगुबाई काठियावाडी'च्या वर्ल्ड प्रीमियरसाठी आलिया भट्ट बर्लिनला रवाना - संजय लीला भन्साळी गंगूबाई काठियावाडी

आलिया भट्ट तिच्या संजय लीला भन्साळीसोबतच्या 'गंगूबाई काठियावाडी' या आगामी प्रोजेक्टच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी ती बर्लिनला बर्लिनला रवाना झाली आहे. बर्लिनेल स्पेशल गालास येथे या खास वर्ल्ड प्रीमियारचे आयोजन करण्यात आले आहे.

आलिया भट्ट
आलिया भट्ट

By

Published : Feb 15, 2022, 2:58 PM IST

मुंबई - 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट बर्लिनला रवाना झाली आहे. बर्लिनेल स्पेशल गालास येथे या खास वर्ल्ड प्रीमियारचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री उशिरा मुंबई विमानतळावर आलिया आणि तिची बहीण शाहीन भट्ट यांना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात क्लिक केले. यावेळी आलियाने संपूर्ण पांढरा वेश परिधान केला होता. तिने मॅचिंग ट्राउझर्ससोबत पांढरा टर्टल नेक घातला होता. नंतर आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या कामाच्या दौऱ्याची एक झलक देखील टाकली आहे. तिची बहीण शाहीन हिचा फोटो शेअर करत आलियाने "बर्लिनले 2022" असे कॅप्शन दिले आहे.

आलिया भट्ट बर्लिनला रवाना

शाहीननेही आलियाचा एक फोटो शेअर केला आहे.

आलिया भट्ट बर्लिनला रवाना

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाची कथा वेश्याव्यवसायात विकलेल्या एका मुलीभोवती फिरते. ती अंडरवर्ल्ड आणि कामाठीपुरा रेड-लाइट विभागाची एक प्रमुख प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कशी बनते यावर आधारित कथानक आहे. अजय देवगणचीही भूमिका असलेला हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -‘चाबुक’ या चित्रपटात गुरु शिष्याच्या भूमिकेत मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ!

ABOUT THE AUTHOR

...view details