मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia bhatt ) सध्या तिचे चित्रपट, रिलेशनशिप आणि लग्नामुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट तिच्या मैत्रिणीच्या लग्नात जस्टीन बीबरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स ( Justin Bieber Songs ) करताना दिसत आहे. आलियाने नुकतीच तिची जवळची मैत्रिण मेघना गोयल हिच्या लग्नाला ( Meghna Goyal Wedding ) हजेरी लावली होती.
मेघना गोयलच्या लग्नात आलिया भट्ट आलियाचा मैत्रीणीच्या लग्नातील लूक
आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर तिची मैत्रिण मेघना गोयलच्या लग्नाच्या काही झलक शेअर केल्या आहेतयात वधू-वरांच्या इतर मित्रांसह आलिया भट्टचे सुंदर फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर पाहिली जात असून खूप पसंत केले जात आहेत. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे ( Alia Look on Freind Wedding ) झाले तर ती खूप सुंदर दिसत आहे. या लग्नात आलिया पीच कलरच्या लेहेंग्यात दिसली आहे.
मेघना गोयलच्या लग्नात आलिया भट्ट आलियाचे इंग्लिश गाण्यावर देसी ठुमके
आलियाने तिचे स्टारडम विसरून तिच्या मैत्रिणीच्या लग्नात मनमोकळा आनंद लुटला. आलियाने इतर मित्र-मैत्रीणींसह पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या ( Justin Bieber Songs ) पीचेस अँड बेबी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. लग्नात आलिया भट्ट सोबत मित्र आकांक्षा रंजन कपूर, अनुष्का रंजन, तान्या साहा गुप्ता, देविका अडवाणी, रिया चॅटर्जी, कृपा मेहता आणि दिशा खटवानी इंग्लिश गाण्यांवर देसी डान्स करताना दिसल्या. याआधी आलियाने मेघना गोयलच्या बॅचलर पार्टीत धमाल उडवली होती. यादरम्यान आलिया तिच्या सर्व जुन्या मैत्रिणींसोबत येथे मोकळेपणाने एन्जॉय करताना दिसली.
मेघना गोयलच्या लग्नात आलिया भट्ट आलिया भट्टचा वर्क फ्रंट
आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यात 'आरआरआर' आणि 'ब्रह्मास्त्र' या दोन पॅन इंडिया चित्रपटांचा समावेश आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरवरून पडदा उचलण्यात आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे.
मेघना गोयलच्या लग्नात आलिया भट्ट हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. आलिया आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा -Sukesh Bollywood Connection : ठग सुकेशचा आणखीही बॉलिवूड अभिनेत्रींशी होता संपर्क, ईडीला दिलेल्या निवेदनात खुलासा