बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर वेळ काढून वडील ऋषी कपूर यांच्या भेटीसाठी गेला. त्याने ऋषी कपूर आणि आई नितू सिंग यांच्यासोबत एक आनंदी फोटो काढला. यावर आलिया भट्टने सुंदर कॉमेंट दिली आहे.
ऋषी कपूर यांच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियावर नितू सिंग नेहमी देत असतात. परिवारासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रणबीर कपूरसोबत डेट करीत असलेल्या आलियाने ह्रदयाची इमोजी टाकत यावर आपली प्रतिक्रिया दिली. नीना गुप्ता आणि गजानन राव यांनीही या परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत.