मुंबई -बॉलिवूडचे टॉप लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेम आता सर्वश्रुत आहे. आलिया आणि रणबीरने आता त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. हे जोडपे वारंवार लंच, डिनर आणि सुट्टीच्या वेळी दिसले. कोरोना आला नसता तर या जोडप्याने गेल्या वर्षी लग्न केले असते, असे रणबीर कपूरनेही म्हटले होते. आता या जोडप्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे. रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
होय, रणबीर-आलिया या वर्षी सेटल होतील असे मीडिया रिपोर्टवरुन समजत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या जोडप्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. याआधी असे बोलले जात होते की हे जोडपे पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सात फेरे घेतील. आता रणबीर-आलियाच्या कुटुंबीयांनी ऑक्टोबर महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.