मुंबई- अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच उधाण आलं आहे. या कपलला अनेकदा एकत्र स्पॉटदेखील केलं गेलं आहे. अशात नुकतंच पुन्हा एकदा ही जोडी मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसली.
ऋषी कपूरच्या भेटीसाठी रणबीर-आलिया न्यूयॉर्कला रवाना, एअरपोर्टवर झाले स्पॉट - new york
ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कममध्ये उपचार घेत आहे. त्यांचीच भेट घेण्यासाठी आलिया आणि रणबीर बुधवारी रात्री उशीरा न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत.
ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कममध्ये उपचार घेत आहे. त्यांचीच भेट घेण्यासाठी आलिया आणि रणबीर बुधवारी रात्री उशीरा न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही उत्तर प्रदेशमधील वाराणसीत आपल्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते.
अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं ही रिअल लाईफ जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जून यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.