महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"फिल्मफेअर ग्लॅमरस" आणि "स्टाईल अवॉर्ड"च्या निमित्ताने दोन ग्लॅम गर्ल्सची झाली भेट - Amruta Khanvilkar latest news

'राझी' या हिंदी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सेहमत' ही महत्वपूर्ण भूमिका राझी मध्ये साकारली होती. तर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या आलियाने 'मुनिरा' ही भूमिका साकारली होती. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'फिल्मफेअर ग्लॅमरस आणि स्टाईल अवॉर्ड'च्या निमित्ताने या दोन ग्लॅमरसगर्ल्सची पुन्हा भेट झाली.

Alia and Amruta
अमृता आणि आलीया भेट

By

Published : Dec 4, 2019, 2:59 PM IST


'राझी' या हिंदी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सेहमत' ही महत्वपूर्ण भूमिका राझी मध्ये साकारली होती. तर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या आलियाने 'मुनिरा' हे भूमिका साकारली होती. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'फिल्मफेअर ग्लॅमरस आणि स्टाईल अवॉर्ड'च्या निमित्ताने या दोन ग्लॅमरसगर्ल्सची पुन्हा भेट झाली.


गेल्याचं वर्षी 'राझी'हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. उत्तम कथा आणि त्याला पुरेपूर न्याय देईल अशी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली. याचं चित्रपटात एक मराठमोळा चेहरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरसगर्ल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सेहमत' ही महत्वपूर्ण भूमिका राझी मध्ये साकारली होती. तर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या आलियाने 'मुनिरा' हे भूमिका साकारली होती.

अमृता आणि आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं सगळ्यांनीच कौतुक केलं. आता मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'फिल्मफेअर ग्लॅमरस आणि स्टाईल अवॉर्ड'च्या निमित्ताने या दोन ग्लॅमरसगर्ल्सची पुन्हा भेट झाली. राझीनंतर अनेक दिवसांनी भेटलेल्या या मैत्रिणींना त्यांचा एकत्र फोटो सोशल मिडियावर टाकण्याचा मोह आवरला नाही. 'व्हेन सेहमत मिट्स मुनिरा' अशा कॅप्शनसह अमृताने त्यांच्या चित्रपटातील भूमिका आणि मैत्रीतील प्रेम व्यक्त केलं.

आता या भेटीनंतर या दोन्ही अभिनेत्री पुन्हा कधी एकत्र काम करणार याबद्दल चर्चा रंगतेय. याच निमित्ताने अमृताने तिच्या हटके लुक्स मधील 'फिल्मफेअर'च्या रेडकार्पेट वरील अनेक भन्नाट फोटोही तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details