महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रिचा चड्ढा आणि अली फजल २०२१ मध्ये बांधणार लग्नगाठ - अली फजल २०२१ मध्ये बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल हे लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. त्यांचा विवाह यावर्षी अखेरीस होणार होता. त्याची तयारीही सुरू होती. मात्र कोरोनामुळे अजूनही जनजीवन सुरळीत न झाल्याने ते २०२१ मध्ये बोहल्यावर चढणार आहेत.

Ali Fazal and Richa Chadha
रिचा चड्ढा आणि अली फजल

By

Published : Aug 4, 2020, 3:59 PM IST

मुंबई - अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करायचे ठरवले होते. परंतु कोरोना संक्रमणामुळे ते लग्न स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी यावर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र आता त्यांनी पुढील वर्षी लग्न करण्याचे निश्चित केले आहे.

एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला की, “ सर्व जनजीवन सुरळीत होईल हे स्वीकारण्यासाठी सक्षम आहोत, त्यानंतर आम्ही तारीख ठरवू, कदाचीत ती नवीन वर्षाच्या सुरुवातीची असेल.''

"म्हणून, लग्नाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या हितासाठी आगामी वर्षापर्यंत लग्न पुढे ढकलणे व्यावहारिक आहे," असे रिचाने म्हटले होते.

या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात मालदीवमध्ये अली फजलने रिचाला रोमँटिक मार्गाने प्रपोज केले होते. या वर्षाच्या अखेरीस मुंबई, लखनऊ आणि नवी दिल्ली येथे लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली होती. आमंत्रणे पाठविणे बाकी होते, परंतु या जोडप्याने सर्व काही निश्चित केले होते. परंतु साथीच्या आजारामुळे ते सर्व नियोजन रद्द करावे लागले.

हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येपूर्वी घरात पार्टी झाली नाही, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

लग्न पुढे ढकलण्याबाबत अलीने यापूर्वी सांगितले होते की, "आमचे लग्न होणार होते, पण ते ढकलले गेले आहे. अर्थात, यामुळे आम्ही थोडे नाराज आहोत कारण आमची तयारी जोरात सुरू होती. परंतु ठीक आहे. आम्हाला लग्नाचा गाजावाजा करायचा नाही. आमच्या आयुष्यातील हे पुढचे पाऊल आहे.''

२०१२ मध्ये फुकरे चित्रपटासाठी एकत्र शूटिंग करत असताना अली आणि रिचा मित्र झाले होते. ते जवळ आले आणि २०१५ मध्ये डेटिंगला सुरुवात केली. तथापि, २०१७ पर्यंत हे प्रेम गुलदस्त्यात होते. त्यानंतर या लव्हबर्ड्सनी हा निर्णय सर्वांना सांगितला.

ABOUT THE AUTHOR

...view details