मुंबई- बहुप्रतीक्षित 'ब्लँक' चित्रपटातून सनी देओल आणि नवोदित चेहरा करण कपाडीया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अॅक्शनचा भरपूर भरणा असलेल्या या चित्रपटातील एक नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात करणसोबत बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारही ठेका धरताना दिसत आहे.
'ब्लँक'मधील 'अली अली' गाणं प्रदर्शित, अक्षय-करण कपाडीयाचा खास डान्स परफॉर्मंस - karan kapadiya
अक्षय आणि करणच्या या परफॉर्मंसने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अली अली' असं या गाण्याचं शीर्षक आहे.
!['ब्लँक'मधील 'अली अली' गाणं प्रदर्शित, अक्षय-करण कपाडीयाचा खास डान्स परफॉर्मंस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3109247-thumbnail-3x2-ak.jpg)
अक्षय आणि करणच्या या परफॉर्मंसने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अली अली' असं या गाण्याचं शीर्षक आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. या गाण्याला आर्को आणि बी प्राक यांनी आवाज दिला आहे. तर आर्को आणि अदीप सिंह यांनी हे गाणं लिहिलं आहे.
मुंबईच्या एका स्टूडिओमध्ये या गाण्याचं चित्रीकरण केलं गेलं आहे. दरम्यान बेहजाद खंबाटा यांनी ब्लँक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, निर्मिती डॉ. श्रीकांत भासी, निशांत पिट्टी, टोनी डिसुजा आणि विशाल राणा यांची निर्मिती आहे. मे महिन्यात ३ तारखेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.