मुंबई- 'भारत', 'टाईगर जिंदा हैं' आणि 'सुलतान'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. अलीने ट्विट शेअर करत आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. हे सर्व काही ठीक झाल्यानंतर ट्विट करून याबद्दलची माहिती देईल, असं अलीनं म्हटलं आहे.
'भारत'चे दिग्दर्शक अली अब्बास जफरचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक - social media hacked
हॅक अलर्ट, ट्विटर आणि इन्स्टाग्राम दोन्ही सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहेत. अनेक फोटो आणि मेसेज आपोआपच पोस्ट केले जात आहेत. याबद्दल मी तक्रार केली असून सर्व ठीक होताच ट्विट करून याबद्दलची माहिती देईल, असं अलीनं म्हटलं आहे.

दरम्यान अकाऊंट हॅक होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अमिताभ यांचंही ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वी हॅक झालं होतं. हॅकरने त्यावेळी अमिताभ यांचा प्रोफाईल काढून त्याठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावला होता. यासोबतच काही ट्विटही करण्यात आले होते. ज्यात लव पाकिस्तान असे लिहित पाकिस्तानच्या झेंड्याचे फोटो शेअर करण्यात आले होते.