मुंबई- दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि सलमान 'भारत' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. याआधीही या जोडीने 'टायगर जिंदा हैं' आणि 'सुलतान'सारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. सलमानसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम असल्याचे अली अब्बास जफरने म्हटले आहे. मात्र, यासोबतच त्यांनी सलमानची एक वाईट सवयही सांगितली आहे.
सलमानच्या 'या' सवयीमुळे अली अब्बास जफरही हैराण; जाणून घ्या, काय म्हणाला - bharat
सलमानसोबत एखादे दृश्य चित्रीत करायचे असल्यास, दिग्दर्शकाच्या डोक्यात आहे, त्यापेक्षाही उत्तम प्रकारे सलमान तो सीन करतो. त्यामुळे त्याच्यासोबतचा कामाचा अनुभव उत्तम असल्याचे अली यांनी म्हटले आहे.
सलमानसोबत एखादे दृश्य चित्रीत करायचे असल्यास, दिग्दर्शकाच्या डोक्यात आहे, त्यापेक्षाही उत्तम प्रकारे सलमान तो सीन करतो. त्यामुळे त्याच्यासोबतचा कामाचा अनुभव उत्तम असल्याचे अली यांनी म्हटले आहे. मात्र, यासोबतच सलमानची एक गोष्ट आपल्याला अजिबात आवडत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सलमान कधीच ठरलेल्या वेळेत सेटवर उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गोष्टींवरून अनेकदा सलमान आणि माझ्यात लहान लहान वाद झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, तरीही त्याची ही सवय बदलली नाही. भाईजानच्या या सवयीमुळे अनेक दिग्दर्शक हैराण आहेत. या यादीत आता अली अब्बास जफरचाही समावेश झाला आहे.