मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडच्या या दोन सुपरस्टारला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकतेच एका मुलाखतीत सलमान आणि शाहरूखसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अली अब्बास जफरच्या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार सलमान आणि शाहरूख! - film
सलमानच्या भारत चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले आहे, शाहरूख आणि सलमान लवकरच एकत्र काम करताना दिसू शकतात.
सलमानच्या भारत चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले की, शाहरूख आणि सलमान लवकरच एकत्र काम करताना दिसू शकतात. माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होवो, असे म्हणत यासाठी आपल्याला स्क्रीप्ट लिहावी लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
शाहरूख आणि सलमानलादेखील पुन्हा एकदा एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे, यासाठी एखादी चांगली स्क्रीप्ट मिळताच ते स्क्रीन शेअर करताना दिसतील, असा विश्वासही अली अब्बास जफरने व्यक्त केला. दरम्यान शाहरूख आणि सलमानने याआधी 'करण अर्जून', 'हम तुम्हारे हैं सनम' आणि 'कुछ कुछ होता हैं' सारख्या सुपरहिटच चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे.