मुंबई -अभिनेता अक्षय खन्ना आणि रिचा चढ्ढा यांच्या आगामी 'सेक्शन ३७५' या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची अखेर घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट १३ सप्टेंबर २०१९ ला चित्रपटगृहात झळकेल.
'सेक्शन ३७५' चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा - रिचा चढ्ढा
स्त्री अत्याचाराचा मुद्दा अधोरेखीत करणारा 'सेक्शन ३७५' हा चित्रपट १३ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यात अक्षय खन्ना आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहेल यांनी केलंय.
'सेक्शन ३७५' चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा
स्त्री अत्याचाराचा मुद्दा या चित्रपटात अधोरेखीत करण्यात आलाय. देशभर वाढत असलेले स्त्री अत्याचार आणि यातून कायद्याच्या पळवाटाचा मार्ग शोधणारे आरोपी यांच्यावर चित्रपटात भर दिला असल्याचे समजते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहेल यांनी केलंय.
'सेक्शन ३७५' मध्ये अक्षय खन्ना, रिचा चढ्ढा, राहुल भट्ट आणि मीरा चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, किशन कुमार यांनी केली आहे.