मुंबई - बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया हॉलिवूड चित्रपट निर्माता दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘टेनेट’ या नव्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. डिंपलचा जावई आणि बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्रिस्तोफर नोलन यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील डिंपल यांना लिहिलेली चिठ्ठी शेअर केली आहे.
चिठ्ठीत असे लिहिले आहे: "डिंपल, मी काय बोलू? तुमच्यासोबत काम करणे आनंदाची गोष्ट आहे. प्रियाच्या व्यक्तीरेखेमध्ये प्राण फुंकताना पाहण्याचा अनुभव विलक्षण होता. तुमचे महान कौशल्य, खडतर मेहनत आणि टेनेटमध्ये दाखवलेल्या प्रतिभेबद्दल धन्यवाद. शुभेच्छा.''
हेही वाचा - अभिनेता म्हणून लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा जबाबदारीची जाणीव होते - आयुष्यमान खुराणा