महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भाईजान नव्हे तर खिलाडी देणार प्रेक्षकांना ईदची भेट, हा चित्रपट होणार प्रदर्शित - लक्ष्मी बॉम्ब

नुकतंच सलमाननं ट्विट शेअर करत इंशाअल्लाह चित्रपट ईदला प्रदर्शित होणार नसल्याचं घोषित केलं. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे चाहत्यांची निराशा झालेली असतानाच आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता चाहत्यांसाठी ईदची खास भेट घेऊन येत आहे.

खिलाडी देणार प्रेक्षकांना ईदची भेट

By

Published : Aug 26, 2019, 5:05 PM IST

मुंबई- बॉलिवूड भाईजान सलमान खान प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी आपल्या चाहत्यांसाठी एक सिनेमा प्रदर्शित करत असतो. मात्र, भाईजान आणि ईदचं हे समीकरण यावर्षी काही कारणास्तव जुळू शकलं नाही. नुकतंच सलमाननं ट्विट शेअर करत इंशाअल्लाह चित्रपट ईदला प्रदर्शित होणार नसल्याचं घोषित केलं.

या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे चाहत्यांची निराशा झालेली असतानाच आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता चाहत्यांसाठी ईदची खास भेट घेऊन येत आहे. अक्षयची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट २०२०ला ईदच्या दिवशी म्हणजेच २२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात अक्षयशिवाय अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटात अक्षय एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याला ट्रान्सजेंडर भूताने पछाडले आहे. लक्ष्मी बॉम्ब हा कांचना या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details