महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षयला भेटण्यासाठी ९०० किलोमीटर पायी आला चाहता, खिलाडीनं शेअर केला व्हिडिओ - आदर्श

अक्षय कुमारने आपल्या चाहत्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चाहता सांगत आहे, की मी गुजरातमधील द्वारका येथून मुंबईपर्यंत ९०० किलोमीटर पायी चालत आलो आहे

अक्षयला भेटण्यासाठी ९०० किलोमीटर पायी आला चाहता

By

Published : Sep 1, 2019, 6:15 PM IST

मुंबई- आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अनेक घटनांमधून हे सिद्ध झालं आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. अक्षयच्या चाहत्याने त्याला भेटण्यासाठी चक्क ९०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे.

हेही वाचा - हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं चित्रीकरण पूर्ण, पाहा व्हिडिओ

अक्षय कुमारने आपल्या चाहत्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चाहता सांगत आहे, की मी गुजरातमधील द्वारका येथून मुंबईपर्यंत ९०० किलोमीटर पायी चालत आलो आहे. अक्षयनं असं करण्यामागचं कारण विचारलं असता, तुमच्याकडून फिट राहाण्याचा आदर्श घेतला असल्याचे तो म्हणत आहे.

अठरा दिवसात त्याने हे अंतर पार केलं आहे. यासाठी अक्षयनं त्याचं कौतुकही केलं आहे. मात्र, अपघात होण्याची शक्यता असल्याचं म्हणत अक्षयनं आपल्या चाहत्याला पुन्हा असं न करण्याचा सल्लाही दिला आहे. यासोबतच आजचं जेवण तू माझ्यासोबत कर, असंही अक्षय या व्हिडिओमध्ये त्याला म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा -शुभ मंगल सावधानला दोन वर्ष पूर्ण, भूमीने शेअर केली भावनिक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details