मुंबई- सुपरस्टार अक्षय कुमारच्या अॅक्शन कॉमेडी बच्चन पांडेने पहिल्या दिवशी 13.25 कोटी रुपये कमावल्याचा दावा निर्मात्यांनी शनिवारी केला. साजिद नाडियादवाला निर्मित, बच्चन पांडे शुक्रवारी रिलीज झाला. यात एका गँगस्टरची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. नाडियादवाला ग्रॅंडसनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने एक पोस्टर शेअर केली आहे, ज्यात चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईचा उल्लेख आहे.
"बॉक्स ऑफिस पे भौकाल. 13.25 कोटी रुपये, पहिल्या दिवशीचे कलेक्शन," असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. हाऊसफुल 4 फेम फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सेनॉन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्याही भूमिका आहेत. व्यापार निरीक्षकांच्या मते, विवेक अग्निहोत्री-दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा असतानाही बच्चन पांडेने आपली उत्तम कामगिरी केली आहे.