मुंबई - साजिद नाडियाडवाला यांच्या 'बच्चन पांडे' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग मार्चपर्यंत सुरू राहील. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबतचा अक्षयचा हा १०वा चित्रपट असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अभिनेत्री कृती सेनन, दिग्दर्शक फरहाद समाजी आणि युनिटच्या इतर सदस्यांसह २ महिन्यांच्या मॅरेथॉन शेड्युलसाठी जैसलमेरला जाणार आहे. यादरम्यान ते वास्तव लोकेशन्सवर शूटिंग करणार आहेत. प्रॉडक्शन टीमने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत आणि सर्व सरकारी मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतले आहेत. शूटिंगची जागा निश्चित केली गेली आहे."