मुंबई - अक्षय कुमार वाईल्ड लाईफ अॅडव्हेन्चर कार्यक्रम 'द वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स'च्या अत्यंत थरारक एपिसोडमध्ये दिसणार आहे.
“तुम्ही विचार करत असाल की, मी वेडा आहे ... पण फक्त वेडेच जंगलात जातात,” असे कॅप्शन बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने लिहून शोचे झलक शेअर केली आहे.
ग्रिल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका नदीत आक्रमक मगर आहेत. थरारक पार्श्वभूमी संगीत असलेल्या क्लिपमध्ये अक्षय आणि बेयर ग्रिल्स ही मगर असलेली नदी दोरीवरुन पार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही क्लिप विशेष भागाच्या तारखांसह समाप्त होते.