मुंबई- महाराष्ट्र सरकारने कंटेनटमेंट झोन वगळता इतर ठिकाणी काही नियम व अटींसह चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. यानंतर काही कलाकार चित्रीकरणासाठी सज्ज झाले आहेत. यातच अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय लवकरच आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.
अक्षय 'बेल बॉटम'च्या चित्रीकरणासाठी सज्ज..! लवकरच लंडनला जाण्याच्या तयारीत - अक्षय 'बेल बॉटम'च्या चित्रीकरणासाठी सज्ज
मिळालेल्या माहितीनुसार बेल बॉटम सिनेमाच्या शूटींगसाठी अक्षय लंडनला रवाना होणार आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते शासनाच्या नियमांच्या अधीन राहात चित्रीकरण करण्यासंबंधी योजना आखत आहेत. अशात बॉलिवूडचा खिलाडी आणि त्याची टीम चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अक्षय जुलै महिन्यात लंडनला जाणार आहे. रंजित तिवारी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाची निर्मिती निखील अडवाणी आणि वशू भगनानी करत आहेत. बेल बॉटमशिवाय अक्षय लवकरच सूर्यवंशी, अतरंगी रे, लक्ष्मी बॉम्ब आणि पृथ्वीराज या सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.