मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. अनेकांनी त्याला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयनं या शुभेच्छांचे रिट्विट करत साऱ्यांचे आभारही मानले आहेत. मात्र, यातील एक ट्विट अक्षयच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण यात तो आपल्या फर्स्ट क्रशविषयी सांगत आहे.
पाचवीत असताना मराठी शिक्षिकेच्या प्रेमात पडला अक्षय, सांगितला मजेदार किस्सा - सिद्धार्थ कन्ननं
सिद्धार्थ कन्ननं अक्षयच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो अक्षयला फर्स्ट क्रशविषयी विचारताना दिसतो. यावर अक्षय म्हणाला, इतरांप्रमाणेच माझी पहिली क्रशही टीचरचं होती. त्या मराठी शिकवायच्या.
सिद्धार्थ कन्ननं अक्षयच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो अक्षयला फर्स्ट क्रशविषयी विचारताना दिसतो. यावर अक्षय म्हणाला, इतरांप्रमाणेच माझी पहिली क्रशही टीचरचं होती. त्या मराठी शिकवायच्या. मी पाचवीत असताना त्या समोर फळ्यावर शिकवत होत्या आणि मी एकटक त्यांच्याकडे पाहात होतो.
त्यानंतर मी माझ्या शेजारी बसलेल्या मित्राच्या कानात काहीतरी बोलायला लागलो आणि टीचरने ते पाहिलं. मित्राला उठवून तो काय बोलत होता? असा सवाल टीचरने केला आणि तो म्हणाला मॅम त्याला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे. यानंतर टीचरने माझ्या वडिलांना बोलवून घेतले आणि हा प्रकार सांगतिला, हे सर्व ऐकून वडिल हसायला लागले. मित्राकडूनच झालेल्या या पोलखोलचा हा मजेदार किस्सा अक्षयने या व्हिडिओत सांगितला आहे.