मुंबई -बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी याची मुख्य भूमिका असलेल्या 'धडकन' चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलाची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप या चित्रपटात कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार, ते ठरले नाही. मात्र, लवकरच अभिनेत्रीचा शोध घेऊन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
'धडकन' चित्रपटाचा बनणार सिक्वेल? - Akshay kumar suniel shetty son aarav ahan dhadkan sequel actor said
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सुनील शेट्टीने अलिकडेच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी चर्चा केली आहे. तसेच निर्माते रतन जैन यांच्याशी देखील या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी चर्चा करण्यात आली असल्याचे सुनीलने सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सुनील शेट्टीने अलिकडेच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी चर्चा केली होती. याबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हटले होते, की 'जर या चित्रपटाचा सिक्वेल तयार झालाच, तर यामध्ये आमच्या मुलांना संधी देण्यात यावी. अक्षयचा मुलगा आरव आणि माझा मुलगा अहान दोघेही आमची भूमिका योग्य पद्धतीने साकारू शकतील. तर, शिल्पाच्या भूमिकेसाठी तिच्यासारखीच अभिनेत्री शोधायला हवी'.
या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी निर्माता रतन जैन यांच्याशी संपर्क साधल्याचेही सुनीलने सांगितले. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वच चित्रपटांचे शूटिंग ठप्प झालेले आहे. सर्व सुरळीत झाल्यानंतर २०२१ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगवर काम करण्यास सुरुवात होईल, असेही रतन जैन यांनी सांगितले आहे.