कोरोना काळात लॉकडाऊन मुळे घरीच बसावं लागल्यामुळे लोकांच्या विचारांत काही सकारात्मक बदल आढळून आलेत. हाताशी असलेला भरपूर वेळ सत्कारणी लावला गेला. बाहेर अस्थिरतेचे वातावरण आणि आर्थिक मंदी या विवंचनेत असणाऱ्या सर्वांनाच कुटुंबाचा आधार खूप काही देऊन गेला. जवळची नाती किती महत्वाची आहेत याचा जणू काही साक्षात्कार झाला. मनोरंजनसृष्टीही जवळपास बंद होती. खिलाडी कुमार अक्षय ने देशाबाहेर पहिले पाऊल टाकले आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही अक्षय कुमार पहिला स्टार आहे ज्याने मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. आनंद एल राय यांच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची त्याने मुहूर्तमेढ रोवली.
‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले असून त्याच्यासोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयला खऱ्या आयुष्यात एकाच बहीण आहे परंतु या चित्रपट त्याला आहेत चार बहिणी. त्यांची नावे आहेत सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत ज्या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग शासनाने आखून दिलेल्या नियमांनुसार सुरु असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नेहमीपेक्षा जास्त काळजी घेतली जातेय. अलका हिरानंदानी आणि आनंद एल राय यांच्या सहकार्याने ह्या चित्रपटाचे सादरीकरण आणि वितरण झी स्टुडिओज द्वारा करण्यात येणार आहे.