मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांशिवाय आपल्या सामाजिक कार्यातील योगदान आणि दिग्गजांसोबतच्या भेटींमुळेही चर्चेत असतो. अशात आता अक्षयने शेअर केलेला एक फोटो त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आठवड्याचा शेवट हा एखाद्या उत्तम व्यक्तीच्या सहवासात जाणे, हे नक्कीच तुमचा संपूर्ण आठवडा उत्तम जाण्यास मदत करणारे असते.
चहा आणि बरंच काही ! अक्षयने आशा भोसलेंसोबत घालवली रविवारची संध्याकाळ - actors
काही उत्तम व्यक्तींच्या सहवासात जेवणालाही उत्तम चव येऊन जाते, असे कॅप्शन आशा यांनी दिले आहे. एका फोटोमध्ये अभिनेता सनी देओलही आशा भोसले यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे.
![चहा आणि बरंच काही ! अक्षयने आशा भोसलेंसोबत घालवली रविवारची संध्याकाळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3394029-thumbnail-3x2-asha.jpg)
यासाठीच अक्षयनेही आपली रविवारची ही संध्याकाळी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासोबत घालवली. आशा भोसलेंसोबतची ही भेट छान राहिली. चहा आणि काही मजेशीर गोष्टींवर गप्पा केल्याने रविवारची ही संध्याकाळ परिपूर्ण राहिली, असे कॅप्शन देत अक्षयने आशा भोसलेंसोबतचा आपला खास फोटो शेअर केला आहे.
आशा भोसले यांनीही या भेटीचे काही फोटो आपल्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात डिंपल कपाडीयाही आहेत. काही उत्तम व्यक्तींच्या सहवासात जेवणालाही उत्तम चव येऊन जाते, असे कॅप्शन आशा यांनी दिले आहे. तर याशिवाय एका फोटोमध्ये अभिनेता सनी देओलही आशा भोसले यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे.