मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अनेक सामाजिक आणि देशभक्तीवर आधारित चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. याशिवाय रिअल लाईफमध्येही अक्षय जवानांच्या कुटुंबीयांना आणि गरजूंना आर्थिक मदत करताना दिसत असतो. आता कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत अक्षयने जवानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
'तेरी मिट्टी में मिल जावां', अक्षयनं शेअर केला जवानांचा व्हिडिओ - कारगिल
या व्हिडिओमध्ये तीन जवान अक्षयच्या केसरी या चित्रपटातील 'तेरी मिट्टी में मिल जावां' गाणं गाताना दिसत आहेत. मात्र या गाण्यातील शब्द त्यांनी बदलले आहेत. इक लाल हुआ बलिदान तो क्या, सौ लाल तेरे रखवाले हैं।' असं ते या गाण्यात म्हणत आहेत.
या व्हिडिओमध्ये तीन जवान अक्षयच्या केसरी या चित्रपटातील 'तेरी मिट्टी में मिल जावां' गाणं गाताना दिसत आहेत. मात्र या गाण्यातील शब्द त्यांनी बदलले आहेत. 'देश मेरे तू जीता रह, तूने शेर के बच्चे पाले हैं। इक लाल हुआ बलिदान तो क्या, सौ लाल तेरे रखवाले हैं।' असं ते या गाण्यात म्हणत आहेत.
अक्षय कुमारनं हाच व्हिडिओ शेअर करत म्हटलं, मनं हेलवणाऱ्या या व्हिडिओने माझा आजचा दिवस खास बनवला. जेव्हा तुमचं छोटसं कार्य योग्य लोकांपर्यंत पोहोचतं, यापेक्षा जास्त अजून काय हवं. आपल्या जवानांना शेकडो सलाम, असं म्हणत भारत के वीर असं हॅश्टॅग अक्षयनं दिलं आहे.