मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार एक उत्तम अभिनेत्यासोबतच उत्कृष्ट फॅमिली मॅनदेखील आहे. अनेकदा तो आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून तो कुटुंबासोबत घालवताना दिसतो. अशात आता लेकीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयनं एक पोस्ट शेअर केली आहे.
अक्षयनं लेक निताराला पोस्ट शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - birthday wishes for daughter
नितारासोबतचा आपला एक फोटो शेअर करत अक्षयनं म्हटलं, ती सर्वाधिक आनंदी तेव्हा असते, जेव्हा वडिलांच्या मीठीत असते आणि तिचे वडिलही तेव्हाच आनंदी असतात.
नितारासोबतचा आपला एक फोटो शेअर करत अक्षयनं म्हटलं, ती सर्वाधिक आनंदी तेव्हा असते, जेव्हा वडिलांच्या मीठीत असते आणि तिचे वडिलही तेव्हाच आनंदी असतात, जेव्हा ती त्यांच्या मीठीत असते. जगातील सगळा आनंद तुला मिळो, हॅपी बर्थडे डार्लिंग नितारा.
विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील अक्षयच्या कुटुंबातील हा तिसरा वाढदिवस आहे. ९ सप्टेंबरला अक्षयचा स्वतःचा, १५ सप्टेंबरला मुलगा आरवचा, तर आज म्हणजेच २५ सप्टेंबरला मुलगी निताराचा वाढदिवस आहे. त्यामुळे, निश्चितच खिलाडीसाठी हा महिना खास असणार आहे.