मुंबई- बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार नेहमीच आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देताना दिसतो. अनेकदा त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जातात. अशात आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षयने आपल्या आईचा योगा करतानाचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना योगाचे महत्व सांगितले आहे.
खिलाडीसोबत त्याची आईदेखील आहे फिट, शेअर केला योगा करतानाचा फोटो - mother
आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षयने आपल्या आईचा योगा करतानाचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना योगाचे महत्तव सांगितले आहे. हा फोटो शेअर करताना मला खूप अभिमान वाट असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.
हा फोटो शेअर करताना मला खूप अभिमान वाट असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली. माझ्या आईने यानंतर योगा करण्यास सुरूवात केली आणि आता योगा हा तिच्या दैनंदिन जीवनातील एक भागच झाला आहे, असं अक्षयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या आईची ही कथा सांगत अजून उशीर झाला नाही, असं म्हणत अक्षयनं सर्वांना योगा करण्याचा संदेश दिला आहे. अक्षयशिवाय इतरही अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपले योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही योगा करण्याचे आवाहन केले आहे.