महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लॉकडाऊन : अक्षय म्हणतो.. 'घरी राहणाराच खरा सुपरस्टार' - अक्षयच्या मते, ''घरी राहणाराच खरा सुपरस्टार''

लॉकडाऊनच्या काळात घरी राहण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी अक्षय कुमारने नवी शक्कल लढवली आहे. एका बिझनेस एक्सपर्टला उत्तर देताना अक्षयने जो यावेळी घरी थांबेल तोच खरा सुपरस्टार, असल्याचे म्हटले आहे.

Akshay
अक्षय कुमार

By

Published : Mar 28, 2020, 12:27 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सध्या संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या प्रसंगी जे लोक घरी थांबतील तेच खरे सुपरस्टार असल्याचे अक्षय कुमारने एका ट्विटच्या उत्तरात म्हटले आहे.

बिझनेस एक्सपर्ट जोगिंदर टुटेजा यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये 'रँबो', 'हिरोपंती 2' आणि 'बागी 4' या चित्रपटांमुळे टायगर श्रॉफ 'सुपरस्टार' आगामी चित्रपटामुळे सुपरस्टार होऊ शकतो असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अक्षयने म्हटलंय, ''जोगिंदर तुमच्या या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. टायगर श्रॉफ आगामी काळात धमाल उडवणार आहे. मात्र आत्ताच्या काळात जो घरी थांबेल तोच खरा सुपरस्टार होईल. मी प्रत्येकाला सुपरस्टार होण्याचे आवाहन करतो.''

२१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व देशवासीयांनी घरीच थांबावे, असे आवाहन अक्षय कुमारने केले आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार सेल्फ-आयसोलेशन, सेल्फ-क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहात आहेत. यात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कैटरीना कैफ, प्रियंका चोपड़ा, शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details