महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

युकेत 'बेल बॉटम'चे शूटिंग आटपून अक्षय परतीच्या मार्गावर - Bell Bottom shoot in UK

अभिनेता अक्षय कुमार 'बेल बॉटम' या चित्रपटाच्या शूटिंगनंतर भारतात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. युकेमधून परतत असताना त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात त्याच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूर विमानासमोर उभी असलेली दिसत आहे.

Akshay Kumar heads hom
अक्षय परतीच्या मार्गावर

By

Published : Oct 3, 2020, 12:40 PM IST

मुंबई - गेली काही दिवस युकेमध्ये 'बेल बॉटम' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार गेला होता. तो भारतात परतण्यास निघाला आहे. आपल्या चाहत्यांना ही बातमी देण्यासाठी त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "मिशन पूर्ण झाले ! दीर्घकाळानंतर अखेर शूटिंग यशस्वी पार पडले. महामारीच्या काळात बेल बॉटमचे शूट झाले. आता परतीची वेळ झालीय.# जेटसेटगो"

अक्षय कुमारने विमानतळावरील फोटो शेअर केलाय. यात त्याच्यासोबत सहकलाकार वाणी कपूर दिसत आहे. ग्लसगो, स्कॉटलँडमध्ये बेल बॉटमचे शूटिंग सुरू होते.

अक्षयच्या ट्विटवर अभिनेत्री हुमा कुरेशी हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. "गरम कपडे घालून तयारीत राहण्याचा शेवटचा दिवस... आता आपल्या देशाला परत येतोय." तिने लिहिलंय.

रणजित एम. तिवारी दिग्दर्शित, 'बेल बॉटम'मध्ये अक्षय कुमारसह वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा स्पाय थ्रिलर चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details