मुंबई- आज ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावेळी अक्षय कुमार आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'पॅडमॅन' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर आधारित चित्रपट पुरस्कार जाहीर केला गेला. याबद्दल अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्नानं ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.
'पॅडमॅन'ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, अक्षय-ट्विंकलनं व्यक्त केला आनंद - सामाजिक कार्यकर्ते
ट्विंकलचं ट्विट रिट्विट करत अक्षय म्हणाला, हा आणि पुढचा फोन मला आला. काहीसा चिंतेत आणि काहीसा आनंदात..हे जाणून घेण्यासाठी की खरंच पॅडमॅनला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर आधारित चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे का.
ट्विंकलनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, मी खूप आनंदी आहे. कारमध्ये असताना जेव्हा मी हे ट्विट पाहिलं तेव्हा मला समजलं, की या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. तर तिचं हे ट्विट रिट्विट करत अक्षय म्हणाला, हा आणि पुढचा फोन मला आला. काहीसा चिंतेत आणि काहीसा आनंदात..हे जाणून घेण्यासाठी की खरंच पॅडमॅनला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर आधारित चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे का. मी फक्त इतकंच म्हणेल, सारी दुनिया से कहो, कॉपी दॅट...असं अक्षयनं म्हटलं आहे.
अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट तमिळनाडूचे सामाजिक कार्यकर्ते अरूणाचलम मुरुगनांथम यांच्या जीवनावर आधारित आहे. आर बाल्की यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि राधिका आपटेशिवाय सोनम कपूरनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नानं या सिनेमाची निर्मिती केली आहे.