महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाला शैतान का साला' नव्हे 'बडे दिलवाला', बिहारच्या पूरग्रस्तांना अक्षय कुमारची 1 कोटींची मदत - अक्षय कुमारची बिहारमधील पूरग्रस्तांना मदत

बिहारमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयने पुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या 25 कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार

By

Published : Oct 29, 2019, 10:07 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपण खरोखर 'बडे दिलवाला' असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. बिहारमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अक्षयने मदतीचा हात पुढे केला आहे.

अक्षयने पुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या 25 कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत बिहारमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहे. येत्या छठ पूजेच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पूरग्रस्तांना ही रक्कम वितरित करण्यात येईल.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसमोर आपण सर्वचजण फार खुजे आहोत. या पूरग्रस्तांना शक्य तेवढी मदत करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मला जो खारीचा वाटा उचलता येणे शक्य आहे तेवढा मी उचलला, असे अक्षय कुमारने सांगितले.

हेही वाचा - नवाजुद्दीन सिद्दीकीचा कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान

यापूर्वीही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटूंबियांना आणि सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details