मुंबई - ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या फोटोत कांद्यापासून बनवलेली इअररिंग आहे. कांद्याचे भाव वाढल्यापासून देशभर कांदा खरेदी करणारा श्रीमंत समजला जात आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षयने पत्नीला कांद्याचा कानातील दागिना भेट म्हणून दिलाय, त्याची सध्या चर्चा आहे.
अक्षयने ट्विंकलला दिला कांद्याचा दागिना, वाचा तिची प्रतिक्रिया - कांद्याचा दागिना
अक्षय कुमाने पत्नी ट्विंकल खन्ना हिला कांद्याचा किंमती कानातील दागिना गिफ्ट दिलाय. ट्विंकललाही तो आवडलाय. कांद्याच्या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दागिन्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
कांद्याचा दागिना
ट्विंकल खन्नाने ही पोस्ट शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "माझा पार्टनर कपील शर्मा शोमधून परतला आणि सांगितले की ही वस्तू करिना कपूरला दाखवत होतो. मात्र, मला नाही वाटत तिला ही आवडली असेल, परंतु मला खात्री होती तुला नक्की आवडेल. म्हणून मी हे तुझ्यासाठी आणलंय."
कधी कधी अशी मजेशीर गोष्ट आवडून जाते. ट्विंकलची ही मस्करीतील पोस्ट लोकांना पसंत येत आहेत. तिच्या उत्स्फूर्तपणाचे आणि हजरजबाबीपणाचे नेहमीच कौतुक होत असते.