मुंबई- बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमार सोशल मीडियाचा मास्टर आहे. सोशल प्लॅटफॉर्मवर दररोज व्यग्र राहून तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. अक्षय बिनधास्तपणे चित्रपट करीत असतो. तसेच तो धमाल-मस्करी करण्यातही मागे राहत नाही. खरंतर अक्षय कुमारने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मी दिसत आहे. हा फोटो अक्षयच्या आगामी चित्रपटातील आहे.
अक्षय कुमारने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक जबरदस्त सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये त्याच्यासोबत इमरान हाश्मीही आहे. सेल्फीमध्ये, दोन्ही स्टार्स रस्त्यावर बाईक चालवत आहेत आणि लुकवाइज देखील मस्त दिसत आहेत.या फोटोमध्ये अक्षयने गोल्डन कलरचे जॅकेट आणि डेनिम्स घातले आहे. त्याचवेळी इम्रानने फुल स्लीव्ह निळ्या टी-शर्टसह जीन्स घातली आहे.
हा सेल्फी शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शन दिले, 'मला माझ्यासाठी परफेक्ट सेल्फी पार्टनर सापडला आहे, करण जोहर, आम्ही हा सेल्फी गेम संपवला आहे की आणखी काही? अक्षयच्या या पोस्टला उत्तर देताना करण जोहरनेही आपली कॉमेंट दिली आहे.